आग लागलेल्या इमारतीत ९ महिन्याच्या बालकासह तास भर अडकला परिवार! शर्थीच्या प्रयत्नांनंतर...  
मुंबई

आग लागलेल्या इमारतीत ९ महिन्याच्या बालकासह तासभर अडकला परिवार! शर्थीच्या प्रयत्नांनंतर...

दिपक घरत

पनवेल : तळोजा फेस 1, सेक्टर 11 येथील एका इमारतीला रविवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या नवव्या मजल्यावर नऊ महिन्यांच्या बालकासह संपूर्ण परिवार तासभर अडकून पडला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संकटकालीन बाहेर पाडण्याचे मार्ग खुले करून इमारतीत भरून राहिलेल्या धुराला बाहेर पडण्यास वाट मोकळी करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. या परिवाराला शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले.

तळोजा फेस 1, सेक्टर 11 येथे असलेल्या ए के प्लाझा या इमारतीच्या सातव्या मजल्यावर रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. इमारतीच्या सातव्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे संपूर्ण इमारत धुराच्या लोटांनी भरली गेली.  तसेच खालच्या मजल्यावरील सर्व रहिवाशांनी तत्काळ इमारत खाली केली. मात्र, नवव्या मजल्यावर नऊ महिन्यांच्या बालकासह संपूर्ण परिवाराला तासभर अडकून पडावे लागल्याची माहिती परिवारातील इम्रान पटेल यांनी दिली. 

11 मजल्याच्या या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त असल्याने यापूर्वीसुद्धा दोन वेळा इमारतीत आगी लागण्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नादुरुस्त असलेली यंत्रणा दुरुस्ती करावी याकरिता इमारतीच्या विकसकाकडे वारंवार विनंती करून रहिवाशाच्या विनंतीकडे विकसक दुर्लक्ष करत असल्याने रविवारी घडलेल्या घटनेत जवळपास 1 तासापर्यंत परिवारासह जीव मुठीत धरून घरात अडकून पडावे लागल्याचा संताप इम्रान पटेल यांनी व्यक्त केला आहे.
----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT