tata power give connection to ganpati mandal with reasonable rate 3 to 10 unit electricity
tata power give connection to ganpati mandal with reasonable rate 3 to 10 unit electricity sakal
मुंबई

Ganesh Chaturthi 2023 : टाटा पॉवर गणेश मंडळांना निवासी दराने वीज जोडणी देणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटा पॉवरने मागील वर्षाच्या आकड्यांवर आधारित गणेश मंडळाशी आधीच संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी टाटा पॉवरने १८० गणेश मंडळांना नवीन कनेक्शन दिली होती.

टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरुपात गणेश मंडळाना वीज जोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे. गणेश मंडळे टाटा पॉवर ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरित्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना- हरकत प्रमाणपत्र आणि चाचणी अहवाल यासारख्या किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात.

मागील वर्षी कंपनीने सर्व गणेश मंडळापर्यंत पोहोचून १५० हुन अधिक जागरुकता सत्रे आयोजित केली होती. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आहे.

जे ग्राहक नवीन कनेक्शनसाठी अर्ज करतात त्यांना आम्ही या उत्पादनांबाबत माहिती देतो. गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारची उत्पादने ५५ पेक्षा जास्त गणेश मंडळांमध्ये प्रदर्शित केली होती. या व्यतिरिक्त टाटा पॉवरने सामान्य जनतेला वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आणि शाश्वत वातावरण निर्माण करतानाच त्यांना ग्रीन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ईव्ही चार्जर बसवले आहेत.

  • युनिट    -        दर                                                           

  • ०-१००      -      ३.३४                                                        

  • १०१-३००     -      ५.८९                                                        

  • ३०१-५००     -      ९.३४                                                        

  • ५०० वर      -      १०.०४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT