Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

सकाळ वृत्तसेवा

Uran News: प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह उरणमधील चिरनेर येथे झुडपात टाकून देणाऱ्या टॅक्सीचालकाला अटक करण्यात आल्यानंतर उरण पोलिसांनी सोहेल इस्माईल खान (वय १९) या दुसऱ्या आरोपीला या हत्या प्रकरणात अटक केली आहे.

सोहेलने टॅक्सीचालक निजामुद्दीन अली याला त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे तपासात आढळून आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निजामुद्दीन अली हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असून तो विवाहित आहे, तसेच त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे.(navi mumbai Crime News)

तर मृत पूनम क्षीरसागर (वय २७) ही अविवाहित असून ती आई व विवाहित भावासोबत मानखुर्द येथे राहत होती. अली याचे पूनमसोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूनम हिचे इतर व्यक्तीसोबतदेखील संबंध असल्याचा निजामुद्दीन अली याला संशय होता. याच संशयावरून निजामुद्दीन अली याने पूनमला फिरायला जाण्याच्या बहाण्याने टॅक्सीमध्ये सोबत घेतले होते.

त्यानंतर त्याने पूनमची हत्या केल्यानंतर टॅक्सीतून तिचा मृतदेह मध्यरात्री चिरनेर येथे आणला. त्यानंतर त्याने मृतदेह टाकण्यासाठी त्याच्या परिचयातील सोहेल खान याला फोन केला. सोहेलने त्याला सुरक्षित जागा शोधून देत पूनमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली.

दरम्यान, सीसी टीव्ही फुटेजमध्ये फक्त पूनम आणि निजामुद्दीन अली टॅक्सीमध्ये असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या हत्येमध्ये अन्य कोणीही सामील नसल्याचे स्पष्ट झाल्याचे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT