Express way 
मुंबई

आयआयटी-मुंबई करणार 'द्रूतगती'वर तांत्रिक सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर (एक्‍स्प्रेस-वे) आडोशी बोगद्याजवळ वारंवार दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी यासंदर्भात तांत्रिक सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आयआयटी-मुंबईची मदत घेणार आहे. या ठिकाणी महिनाभरात तीन वेळा दरड कोसळली होती. 

एक्‍स्प्रेस-वेच्या उभारणीदरम्यान करण्यात आलेली वृक्षतोड आणि अशास्त्रीय पद्धतीने डोंगर कापल्याने दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याचे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे मार्गाच्या परिसरातील भूस्तर कमकुवत झाला आहे. पावसाचे पाणी डोंगरांच्या भेगांमध्ये जाऊन नैसर्गिक भेगा वाढल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. आडोशी बोगदाच्या उभारणीच्या वेळी डोंगर ट्रेचिंग पद्धतीने कापला गेला आहे.

खरे तर 45 ते 50 अंशांत डोंगर कापणे आणि मार्ग करणे ही योग्य पद्धत आहे. परंतु येथील डोंगर 70 ते 80 अंशांत कापले गेल्याने दरडीचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत 'वाळा' वनस्पतीची लागवड करणे हा एक पर्याय आहे. परंतु यासोबतच अन्य काही उपाययोजनांच्या चाचपणीसाठी आयआयटी-मुंबईच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने दरड कोसळण्याच्या ठिकाणाचा अभ्यास केला जाणार आहे. 

जिओग्राफिक इन्फॉरमेशन तज्ज्ञांची (जीआयएस) तसेच सॅटेलाइट इमेजची मदतही घेतली जाणार आहे. यापूर्वी कळसूबाईच्या शिखर परिसरातील दरडींच्या जागा निश्‍चित केल्या होत्या व त्यावर उपाय योजले होते. त्याच धर्तीवर एक्‍स्प्रेस-वेवरील काम करणे गरजेचे असल्याने, एमएसआरडीसी याविषयी आयआयटीची मदत घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

SCROLL FOR NEXT