मुंबई

मुंबईसह महाराष्ट्र गारठला! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात थंडीने जोर धरला आहे. गुरुवारी (ता. 16) किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. नाशिकमध्ये गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईतील सांताक्रूझ येथे किमान तापमान 15.4 आणि कुलाबा येथे 17.6 अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी 9ता. 17) मुंबईतील किमान तापमान 14 अंशापर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

वाढलेल्या थंडीमुळे मुंबईसह राज्यात हवेतून पसरणारे स्वाईन फ्लूसारख्या आजारांसह ताप, सर्दी, खोकल्याचा आजारही वाढण्याची शक्‍यता आहे. उत्तरेपेक्षा राज्यातील हवेचा दाब कमी झाल्याने उत्तरेकडून राज्यात थंडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होऊ लागली आहे, असे हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. 
तापमान आठ अंशापेक्षा खाली आल्यास पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. पिकांची पोषकक्रिया बंद होऊन पिके कोमेजून जातात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी राज्याचे तापमान 4-5 अंशापर्यंत खाली आले होते. त्या वेळी सुर्यफुलाच्या पिकावर दुष्परिणाम झाला होता, असा दावाही डॉ. साबळे यांनी केला. राज्यात तापमान आठ अंशाच्या खाली येण्याची शक्‍यता आहे. जास्तीत जास्त एक-दोन दिवस काही तुरळक ठिकाणी अशी परिस्थिती राहू शकते; मात्र संपूर्ण राज्यावर त्याचा परिणाम जाणवणार नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसते, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले. 

मुंबईत आज हुडहूडी 
मुंबईतील तापमानातही प्रचंड घट होऊ लागली आहे. बुधवारपेक्षा गुरुवारी तापमानात दोन अंशापर्यंतची घट झाली. शुक्रवारीही तापमानात घट होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईत शुक्रवारी किमान तापमान 14 अंशापर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी कुलाबा येथे कमाल 26 आणि किमान 17.6, तर सांताक्रूझ येथे कमाल 25 अंश आणि किमान 15.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुण्यात धुके दाटणार 
पुणे परिसरात दोन दिवसांपासून पहाटे धुके पडत आहे. पुढील दोन दिवसांत धुके आणखी दाट होईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. पुण्यात सध्या 12.1 अंश सेल्सिअस नोंदला गेलेला किमान तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांत 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT