temple 
मुंबई

राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंदच; राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचनाद्वारे देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले. काही राज्यामध्ये सोमवारपासून मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे सुरू होत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यासह मुंबईतील सिद्धीविनायक, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिर आणि मशिदी , चर्च, गुरूद्वारा बंदच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांना देवदर्शन अजूनही दूरच आहे. घरातून भाविकांनी देवपूजन, नमाज व प्रार्थना करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने मार्गदर्शन सूचनांद्वारे देशातील धार्मिक स्थळे सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, याचा निर्णय संबंधित राज्यांनी त्यांच्याकडील कोरोनाची परिस्थिती पाहून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत कोणतीही मार्गदर्शन सूचना जारी केल्या नाहीत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. धार्मिकस्थळे सुरू केली तर तेथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने तेथे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार आहे. 

तसेच प्रत्येक धर्माचे धर्मगुरू राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करत आहेत. राज्य सरकार ज्यावेळी धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी देतील त्यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ती खुली केली जातील, असे मंदिर प्रशासन व चर्च, मशिदी , गुरूद्वारा येथील धर्मगुरू आणि प्रशासनाचे म्हणणे आहे. महालक्ष्मी मंदिर प्रशासनाने शरचंद्र पाध्ये म्हणाले, केंद्राने मार्गदर्शन सूचना दिल्या व परवानगी दिली पण राज्य सरकारने अजून परवानगी दिली नाही. त्यामुळे मंदिर बंदच राहील. जेव्हा राज्य सरकार परवानगी देईल तेव्हा सर्व अटी व नियमांचे पालन करून मंदिर भाविकांना खुली होतील. 

मशिदी खुले करण्याबाबत मौलाना काश्मिरी म्हणाले, केंद्राची परवानगी आहे पण जोपर्यंत राज्य सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत मशिदी या बंदच राहणार आहेत. राज्य सरकारला पूर्णतः आम्ही सहकार्य करत आहोत. राज्य सरकारची परवानगी नाही त्यामुळे चर्चही बंदच राहणार आहे, सरकारच्या निर्णयाला आमचा कायम पाठिंबा आहे, असे फादर रिचर्ड डबरे म्हणाले. गुरूद्वारा बंदच राहणार आहे, राज्य सराकर परवानगी देईल तेव्हा गुरूद्वारा उघडण्यात येईल, असे महाराष्ट्र शीख असोसिएशन दलजीत सिंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokulमधील ४ शासन नियुक्त संचालकांचे राजकीय लागेबांधे, कोण कुठल्या नेत्याच्या जवळचा? कोणत्या पक्षाच्या कोट्यातून वर्णी?

Jejuri Somvati Yatra: जेजुरीत रंगला सोमवतीचा सोहळा ;भाविकांची गर्दी; गडावर भंडाऱ्याची उधळण अन् आतषबाजी

Pune News: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ लाखांची फसवणूक

IND vs NZ 3rd ODI Live : पाऊस थांबला, पण षटकांची संख्या झाली कमी; भारत-न्यूझीलंड तिसरी वन डे किती वाजता सुरू होणार? अपडेट्स

Pune News: परीक्षा शुल्क माफीसाठी अन्यायकारक अटींचा अडसर ;विद्यार्थ्यांमध्ये संताप ; सरसकट शुल्क माफ करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT