मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो-एसटीची धडक; टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू, २१ जण जखमी

संतोष सुतार

मुंबई:  मुंबई-गोवा महामार्गावर एसटी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.  माणगावपासून 10 किमी अंतरावरील नगरोली फाटा येथे ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांमधील 21 जण जखमी झाले.
 
टेम्पो चालक अनंत मोतीराम वाघमारे (वय 40, रा. भाले आदिवासीवाडी, निजामपूर ता.माणगाव) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये भाताचा तूस भरून कामगारांना सोबत घेऊन इंदापूरकडे निघाला होता. माणगावजवळील नगरोली फाटा येथे भरधाव वेगात निघालेल्या या टेम्पोने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मुंबईकडे निघालेल्या एसटीला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये एसटीची चालक बाजू आणि टेम्पोच्या केबिनचा चुराडा झाला. टेम्पो चालक अनंत वाघमारे याचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. 

दोन्ही वाहनांमधील जखमी झालेल्यांची नावे 

  • रामचंद्र यशवंत रसाळ (54, रा.सोनसडे ता.तळा)
  • अमजद शेख मकबूल शेख (वय 34, रा.भाईंदर मीरा मूळ रा.पश्चिम बंगाल)
  • अनिकेत अरुण गोगरकर (वय 24, रा.मंडणगड)
  • राकेश शंकर कदम (वय 30, रा.वाशी नवी मुंबई)
  • सतीश तुळशीराम मोरे (वय 55, रा.साकीनाका मुंबई)
  • नथुराम सखाराम मोरे (वय 57, रा. उंबर्डी ता.माणगाव)
  • रविंद्र लक्ष्मण वाघमारे (वय 20, रा.भाले ता.माणगाव)
  • महेश हनुमंत जाधव (वय 20, रा.निवी आदिवासीवाडी ता.माणगाव)
  • संदीप मनोहर वाघमारे (वय 19, रा.भाले ता.माणगाव)
  • पोपट काटे (वय 60, रा.महाड)
  • नाना काशीराम सोळंकी (वय 68, रा.महाड)
  • अशोक शंकर चव्हाण (वय 52, रा.पनवेल)
  • प्रशांत शिवराम पिंपळकर (वय 33, रा.दापोली जि.रत्नागिरी)
  • संजय मधुकर जायले (वय 35, रा.नालासोपारा डेपो)
  • रामनाथ जायकू मिरवळ (वय 46, रा.नालासोपारा डेपो, मूळ रा.जि.जालना)
  • विवेक बाळूसव भुवन (वय 37, रा.डहाणू कानाडी कांदिवली प.)
  • अमित नागराज जोशी (वय 42, रा.वर्तक नगर ठाणे प.)
  • योगिता अनंत पाचकले (वय 35, रा.गिरगाव फणसवाडी मुंबई)
  • अंकिता तुषार तटकरे (वय 25, रा.दादली किंजलघर महाड)
  • तुषार रामचंद्र तटकरे (वय 28, रा.दादली किंजलघर महाड)
  • कमल अनंत जाधव (वय 35, रा.कोपरी गाव, वाशी, नवी मुंबई) 

हे 21 जण जखमी झाले आहेत.  

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना औषोधोपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात माणगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी जखमींची विचारपूस करून माहिती घेतली.तसेच माणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य महामूद धुंदवारे, रणधीर कनोजे यांनीही रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस करून त्यांना मदत केली.   या अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगले या करत आहेत.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Tempo ST crash Mumbai Goa highway Tempo driver killed on the spot 21 injured

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT