parambir singh esakal
मुंबई

"परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस!'' 12 साक्षीदारांची साक्ष

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. गुन्हे शाखेच्या चौकशीत १२ साक्षीदारांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिल्याने आता सिंग पुरते अडकले जाण्याची शक्यता आहे. "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच सचिन वाझेचे १ नंबर बाँस" असा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे (sachin waze) तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी, लाचलुचपत विभाग तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच वाझेचे 1 नंबर बॉस

दरम्यान गुन्हे शाखेच्या चौकशीत १२ साक्षीदारांनी दोघांविरोधात साक्ष दिली आहे. तसेच हे सर्व जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. परमबीर या़ंच्यावर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सध्या गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत. याच गुन्ह्यात परमबिर सिंह यांना काल (ता.१२) चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स करण्यात आले होते मात्र ते गैरहजर राहिले. या गुुन्ह्यात १२ जणाचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून या १२ जणांनी अँटिलिया घटना आणि मनसुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सचिन वाझे याचा नंबर वन बाँस हा परमबीर सिंह होता. असे जबाबात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून सीआयडी,लाचलुचपत विभाग तसेच गुन्हे शाखा त्यांची चौकशी करीत आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. इतर यंत्रणांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारी देखील परमबीर यांच्या शोधात आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष चौकशी आवश्यक असल्याचे कारण देत गुन्हे शाखेने परमबीर यांना नोटीस धाडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT