मुंबई

अरे वाह! मुंबईत स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, ठाकरे सरकारचा मोठा प्लान 

पूजा विचारे

मुंबईः प्रत्येकाला वाटतं आपलं एक घरं असावं. त्यात आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर घ्यावं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र काही कारणास्तव ते शक्य होत नाही. मात्र आता मोठ्या घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारनं मोठा प्लान आखला आहे. या प्लाननुसार तुम्हाला गोरेगावसारख्या भागात कमी पैशात घर मिळणार आहे. अशा प्लानची कोणी कल्पनादेखील केली नसेल. ही खास योजना मुंबईकरांसाठी आणली आहे. सध्या मुंबईत साध्या घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहे. अशात गोरेगावसारख्या भागात मुंबईकरांना केवळ ३० लाखांमध्ये घर खरेदी करता येणारेय. गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात पहिल्यांदाच परवडणारी घरं तयार करण्यात आलीत. 

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, या गृहनिर्माण योजनचं भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. तसंच केंद्र सरकार ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत या योजनेला मान्यता देखील देणार आहे.  ही जागी खाजगी मालकीची आहे आणि तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. गेल्या बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्यानं निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, असं नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितलं. 

म्हैसकर यांनी सांगितलं की, मुंबईत सुरु होणार असलेला हा गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा नागरिकांसाठी असेल. यात ३०० चौ.किमी घराची जागा असणार असून ज्यामध्ये विकासकामाला त्याल विकसकास फ्लोर स्पेस इंडेक्सला २.५ मध्ये परवानगी दिली जाईल. यामध्ये ५० टक्के भाग हा १५०० EWS युनिटमध्ये प्रकल्पाला असणार आहे. तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे.

जर सरकारनं या योजनेस परवानगी दिली तर ५०-५० अशी सार्वजनिक-खासगी भागीदारी होऊ शकते. कारण ही जमीन खाजगी आहे. तर जागेचं क्षेत्रफळ हे १० एकरपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. खाजगी डेव्हलपर हे कोणत्याही स्थानिक प्राधिकरणात भागीदारी करु शकतात. मुंबईमध्ये बीएमसी, एमएमआरडी, एसआरए किंवा म्हाडा देखील असण्याची शक्यता आहे.

Thackeray Government build 1500 flats rs only 30 lakh goregaon jitendra ahwad told

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT