Thackeray group leader Sudhir More suicide case son allegation of torture by woman lawyer mumbai crime  
मुंबई

Mumbai News : ठाकरे गटाचे नेता सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी वकील महिलेनं छळ केल्याचा मुलाचा आरोप

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी वकील महिला नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधीर सयाजी मोरे यांनी गुरूवारी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला . सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी वकील महिला नीलिमा चव्हाण यांनी सुधीर मोरे यांचा छळ केल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.

31 ऑगस्ट गुरूवारी रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर येथील रेल्वे रूळावर आढळला होता. गुरूवारी वैयक्तिक कामासाठी बाहेर चाललो, असं मोरे यांनी आपल्याखासगी सुरक्षारक्षकाला सांगितलं होतं. तसेच, गाडी न घेता मोरे यांनी रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन मोरे यांनी आत्महत्या केली होती.

अशात सुधीर मोरे यांचा छळ केल्याप्रकरणी मुलाने नीलिमा चव्हाण यांच्यावर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर रेल्वे पोलीस नीलिमा चव्हाण यांच्या विक्रोळीतील घरी तपासणी केली. पण नीलिमा चव्हाण यांनी घर बदललं असल्याचं समोर आलं आहे.

तपासात पोलिसांनी घाटकोपर स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मृत्यूपूर्वी मोरे कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचं समोर आले आहे. तसेच, नीलिमा चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी कलाकारांची ठाकरेंच्या मेळाव्याला मोठी हजेरी – कोण कोण आले आहे?

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT