Uddhav Thackrey Esakal
मुंबई

Dasra Melava: शिवाजी पार्कवर घुमणार उध्दव ठाकरेंचा आवाज! दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने दिला ग्रीन सिग्नल

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने आज ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

जागेसाठी ठाकरे गटासोबतच शिंदे गटानेही परवानगीसाठी पत्र दिले होते, परंतु त्यांनी ते पत्र नंतर मागे घेतलं होतं. त्यामुळं ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला होता. २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षी देखील पेच निर्माण झाला होता. यंदा देखील पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली होती, पण अखेर हा पेच निकाली निघाला आहे. कारण शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतला होता, त्यामुळं ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. दरम्यान आज ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे

यंदा १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटानं तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटानं महापालिकेकडं शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. 

मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली आहे. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT