ShivSena 
मुंबई

Thackeray ShivSena: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालिका अधिकाऱ्याला मारहाण; नेमकं काय घडलंय वाचा

अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर आरोप करताना त्यानं चुकीचं काम केल्याचा दावा केला आहे. पण हा नेमका प्रकार काय आहे? जाणून घेऊयात. (Thackeray ShivSena activists beat municipal officer what actually happened need to know)

नेमकं घडलं काय?

शिवसेनेच्या शाखेचं अनधिकृत बांधकाम तोडण्यावरुन हा वाद झाला आहे. ही शाखा ठाकरे गटाची असून त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा होत्या. त्या प्रतिमा काढून न घेताच शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवण्यात आला. त्यामुळं चिडलेल्या शिवसैनिकांनी पालिकेत जाऊन थेट संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांसमोरच मारहाण केली. (Latest Marathi News)

शिंदेंचं ठाकरेप्रेम बेगडी

या प्रकरणावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, "अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही पण जी शाखा पालिकेकडून पाडण्यात आली. त्या शाखेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता, छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती होती.

कार्यकर्ते सांगत होते की, या गोष्टी आम्हाला काढायला द्या. तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यानं जेसीबी चालवून ती शाखा तोडली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि महाराजांच्या प्रतिमेचा अपमान झाला. त्यामुळं शिवसैनिक संतप्त झाले. ते कधीही ही बाब सहन करणार नाहीत. (Marathi Tajya Batmya)

मी आज पाण्यासाठी मोर्चा काढला होता त्यातच हा विषय आला आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. त्यामुळं माझा शिंदे सरकारला प्रश्न आहे की, ज्या अधिकाऱ्यानं बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्या अधिकाऱ्याला ते पाठिशी घालणार आहेत का? जर त्यांनी पालिका अधिकाऱ्याला पाठिशी घातलं आणि शिवसैनिकांवर कारवाई केली तर त्यांचं बाळासाहेबांवरील प्रेम बेडगी आणि दाखवण्यापुरतं आहे असं आम्ही मानू, असंही यावेळी अनिल परब यांनी म्हटलं आहे.

गुन्हा दाखल होणार

दरम्यान, अधिकारी मारहाण प्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ज्या अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला जाणार आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT