मुंबई

ठाण्याच्या रेतीबंदर पुलावर भीषण अपघात, कंटेनर थेट खाडीत

पूजा विचारे

मुंबईः ठाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाणे पश्चिमेकडील रेती बंदरच्या पुलावर हा अपघात झाला आहे. या पुलावरुन कंटेनर थेट खाडीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. एका बोटीच्या मदतीनं बचावकार्य राबवण्यात आलं. 

सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. खारेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. अपघातग्रस्त कंटेनरचा क्र. MH 04 HY 8691 असा असून हा कंटनेर राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा आहे. ५५ वर्षीय रमेश पांडे नावाचा चालक हा कंटेनर भिवंडीहून न्वाहा शेवाकडे निघाला होता. 

रेतीबंदर पुलाचा संरक्षक कठडा तोडून हा कंटेनर खाडीत कोसळला. दरम्यान कंटेनरचा चालक पांडे याला वाचवण्यात यश आलं असून त्याला माजिवाड येथील परम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

thane accident contianer break retibunder creek bridge one injuried

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT