मुंबई

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ अपलोड करणारा भामटा अटकेत

पूजा विचारे

मुंबईः महिलाचं लैंगिक शोषण करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा भामटा नोकरीचं आमिष दाखवून महिला आणि तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. आरोपी तरुणींचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करायचा, अशी माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपीचं नाव मिलिंद झाडे आहे. आरोपी ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टमध्ये (टीएमटी) बस कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. 

आरोपीनं शिव वैशाली नावानं ही वेबसाइट सुरु केली होती. त्यावर मिलिंद झाडे पॉर्न असलेला कंटेंट अपलोड करायचा. तसंच इंटरनेट यूजर्सकडून हे पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी आरोपी पैसेही आकारत होता. मिलिंद झाडे यानं सुरु केलेल्या वेबसाइटवर अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ क्राईम ब्रांचला आढळून आलेत. 

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीनं पॉर्न व्हिडिओतून हजारो डॉलर्सही कमावलेत. चौकशीदरम्यान समोर आलं की, लाखो रुपये पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवून अनेक महिलांना आरोपी मिलिंद झाडे यांनी आपल्या जाळ्यात ओढलं होतं.

त्यात एक पिझ्झा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला आरोपीनं लाखो रुपयांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून आरोपीनं शारिरीक संबंध बनवले होते. त्यानंतर आरोपीनं तिचा व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केला. वेबसाइटवर अपलोड केलेला पीडित तरुणीच्या एका नातलगानं पाहिला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

आरोपी मिलिंद झाडे विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान आरोपीनं काही तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचं क्राईम ब्रांचला समजले आहे. आणखी एका तरुणीनं वालीव पोलिस स्टेशनमझ्ये आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Thane Bus Conductor arrested Milind zade uploading adult video website

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT