traffic police sakal media
मुंबई

ठाणे पोलिसांनी उतरवली मद्यपींची झिंग; एक हजार १६२ जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून सण, उत्सवांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचे रुग्ण (corona patients) घटल्याने निर्बंधात शिथिलता आणली होती. त्यामुळे होळी, धूलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी (Thane traffic police) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार १६२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये १८७ मद्यपींचा (Action against drunker) समावेश असून त्यांची झिंगच पोलिसांनी उतरवली.

होळी, धूलिवंदनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी कंबर कसली होती. होळीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात कारवाई मोहीम सुरू केली होती. मागील काही वर्षांपासून जनजागृती करूनही लोक होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी मद्य प्राशन करून वाहने चालवतच असल्याचे निदर्शनास आले. यंदा ठाणे शहर पोलिसांनी २२ श्वास विश्लेषकांसह १५ प्रमुख नाक्यांवर दीडशेहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने मद्यपी चालकांविरोधात कारवाई केली.

शुक्रवार रात्रीपर्यंतची कारवाई

मद्यपी चालक १२२
सहप्रवासी ६५
ट्रिपल सीट २०८
विना हेल्मेट ७६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra El Nino Effect : कमी दाबाचा पट्टा ओसरला, महाराष्ट्रात आता पावसाची प्रतिक्षा; अल निनोचा प्रभाव तीव्र होणार?

MSRDC Airlift Service: द्रुतगतीवर जखमींना करणार ‘एअरलिफ्ट’! एमएसआरडीसीचा अभ्यास सुरू; समृद्धी, मुंबई-पुणे मार्गावर लवकरच सेवा

New Marathi Book : निसर्ग आणि मानवी भावनांची अनोखी गुंफण

Maharashtra Politics: संजय राऊत हेच ‘महाराष्ट्राला लागलेला कलंक’ : भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांचा पलटवार

Marathi Book Reviews : स्वागत नव्या पुस्तकांचे

SCROLL FOR NEXT