Badlapur Crime Updates sakal
मुंबई

Thane Crime News: बदलापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 32 इंची टीव्ही चोरीला

लग्नकार्यात भेट देण्यासाठी चक्क टीव्ही चोरला; चोरीची संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद

सकाळ वृत्तसेवा

badlapur Crime News: बदलापूरच्या बेलवली सारख्या गजबजलेल्या परिसरातील एका टीव्ही शोरूम मधून 32 इंचाचा टीव्ही दुकानदाराच्या नजरेसमोरच, चोरून नेल्याची घटना घडली आहे.

लग्नकार्यात भेट देण्यासाठी म्हणून टीव्ही पाहत असल्याचे कारण देत या चोराने, दुकानात सगळ्यांचे लक्ष हलताच चक्क टीव्ही चोरला असून, ही संपूर्ण घटना येथील सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

बदलापूरच्या बेलवली परिसरात माऊली इलेक्ट्रॉनिक्स नावाचं ससाणे या दुकान मालकाचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व मोबाईल चे दुकान आहे, मंगळवारी रात्री दुकान चालू असतानाच एक अनोळखी व्यक्ती दुकानात टीव्ही खरेदी करण्यासाठी आला होता.

लग्न कार्यात भेट देण्यासाठी म्हणून टिव्ही पाहत असल्याचे त्याने सेल्समन ला सांगितले. यावेळी वेगवेगळ्या कंपनीचे अनेक टीव्ही बघितल्यानंतर या चोरट्याने मोठ्या शिताफीने 32 इंची एलईडी टीव्ही लंपास केला.

दुकानातील नोकर बिल बनवत असताना या चोरट्याने ही संधी साधली असून, ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यावेळी या चोरट्याने मास्क लावला असल्याने त्याचा संपूर्ण चेहरा मात्र या सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही. याप्रकरणी दुकान मालकाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT