मुंबई

Thane Dry Run: ठाण्यात कोरोना लसीची आज ड्राय रन

राहुल क्षीरसागर

मुंबईः  'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन्ही कोरोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्याने लसीकरण केव्हाही सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच नंदुरबार, जालना आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची यशस्वी ड्राय रन मोहीम पार पडली. त्यानुसार शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि दिवे अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध महापालिका क्षेत्रांमध्ये ड्राय रन मोहीम राबविण्यात येत आहे. 

देशभरातील सर्वच आरोग्य यंत्रणांसोबत राज्यातील विविध जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी देखील लसीकरणाची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यात नुकतेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरणाची ड्राय रन मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात देखील ड्रायरन मोहिम शुक्रवारी राबविण्यात येत आहे. यामध्ये ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय शहापूर आणि दिवे अंजूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ड्रायरन घेण्यात येणार आहे. त्यात शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत या ड्राय रन मोहिमेची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे. यावेळी 25 जणांवर या लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. 

ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाने समन्वयाअभावी मंगळवारी ड्राय रन घेण्याचे नियोजन फसले होते. त्यानंतर शुक्रवारी महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत ड्राय रन चाचणी घेण्यात येणार आहे. कोविड 19 लसीकरणाची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात येणार असून या ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर आब्जर्वेशन कक्षही निर्माण करण्यात आला आहे. या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एकूण 25 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना तसे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यांनी ड्राय रनसाठी कोणत्या वेळेत उपस्थित राहायचे आहे ती वेळही कळविण्यात आली आहे. 

तसेच लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन (CO-WIN) या ॲपवर अद्ययावत करण्यात आली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॅाक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली मापालिका क्षेत्रासह भिवंडी, मीरा – भाईंदर यांच्यासह विविध महापालिका क्षेत्रात देखील शुक्रवारी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या ड्रायरन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आरोग्य विभागासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सरसावल्या आहेत.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane district conduct vaccine dry run three places Thane Civil Hospital Diva and Shahapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT