मुंबई

मुंबईजवळ असलेल्या 'या' जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं असताना मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर येतेय. एकेकाळी मुंबई शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र आता मुंबईत कोरोना नियंत्रणात येत आहे. यासोबतच ठाणे शहर, मुंब्रा परिसर, कल्याण पूर्व भाग, उल्हासनगर आणि भिवंडी शहरांमधील रुग्णवाढीच्या प्रमाणात घट होताना दिसतेय. 

ठाण्यात कोरोनाची सुरुवात मुंब्रा परिसरातून झाली. त्या झोपडपट्टी भागातून कोरोनाचा धोका आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण आता याच भागातून एक आनंदाची बातमी समोर येतेय. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांमध्ये फक्त ५३ नवे कोरोना रुग्ण समोर आलेत.

ठाणे जिल्हा गेला महिनाभर कोरोनाच्या कचाट्यात सापडला होता. ठाणे शहरांमधील दाटीवाटीच्या मानल्या जाणाऱ्या मुंब्रा, वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर या परिसरामध्ये दिवसाला ६० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. या परिसरात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लॉकडाऊनचे काटेकोर नियम पाळल्याने इथे कोरोनाला आळा घालण्यात आला असल्याचं या भागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

महापालिका प्रशासनाकडून शहरातील मुंब्रा, वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर या भागांना कोरोना संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं. या सर्व भागांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केलं होतं. तसंच सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या विलगीकरणावर भर  देण्यात आला होता. उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील संक्रमित क्षेत्रांमधील रुग्णसंख्येत ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच घट होत असल्याचे दिसत आहे. 

सद्यपरिस्थितीवर लक्ष टाकल्यास, लोकमान्यनगर भागात दररोज ३० ते ४० नवे रुग्ण आढळून येताहेत. वागळे इस्टेट परिसरात दररोज १६ हून कमी रुग्ण आढळून येत आहेत. मुंब्रा परिसरात गेल्या आठवड्यापासून दररोज १० हूनही कमी रुग्ण आढळत आहेत.

प्रामुख्याने ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुंब्रा परिसर, तर कल्याण-डोंबिवली शहरांतील कल्याण पूर्व परिसर, उल्हासनगर आणि भिवंडी शहर यांसारख्या संक्रमित भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या आठवड्यापासून घटल्याचं दिसतंय.

thane district covid 19 improves doubling rate 69 days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT