मुंबई

ठाणे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; नवीन रुग्णांची संख्या नियंत्रणात

राहुल क्षीरसागर

 ठाणे :  ठाणे जिल्ह्यात मागील सात ते आठ महिन्यापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे या आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून या आजाराबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानामुळे लोकांमध्ये आजाराबाबतची होत असलेली जागरूकता, पाळण्यात येणारे नियम यांमुळे कोरोना या आजारावर अटकाव आणण्यात आरोग्य विभागाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासूनच नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सहाशेच्या आत होती. मात्र, आता ती थेट तीनशे ते साडे तीनशेच्या घरात येवून पोहोचली आहे. त्यामुळे हळूहळू ठाणे जिल्ह्याची कोरोन मुक्ती कडे वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

  मागील सात ते आठ महिन्यांपासून देशभरात सर्वत्र कोरोना या आजाराने हाहाकार उडवून दिला आहे. त्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. त्यावेळी अवघे हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील रुग्ण जिल्ह्यात नव्हते. मात्र, जस जसा एप्रिल महिना उडण्यास सुरुवात झाली. तसतसे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत गेली. त्यात एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात महिन्यात कमालीची वाढ झाली. या कालावधीत दिवसाला नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात जात होती. तर, मृतांची संख्या देखील 45 ते 50 पर्यंत पोहोचली होती. या वाढत्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यात रुग्णांना बेड्ससाठी वाट पाहत राहावी लागत होती. तर, अनेकांचे वेळेत रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. या सर्वाची गांभीर्याने दाखल घेत, ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर उभारणे, खासगी नॉन कोविड रुग्णालयांचे कोविड रुग्णालयात रुपांतर करणे आदी विविध उपाययोजना केल्याने जिल्ह्यात रुग्णांचे बेड्स अभावी होणारे हाल थांबण्यास मदत झाली. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळून रुग्णबरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत गेली. 

      दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली आल्याचे दिसून आले. तर, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ती थेट 600 च्या घरात आल्याचे दिसून आले. त्यात मागील तीन ते चार दिवसापासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आणखी घट होवून ती 300 ते 350 च्या आसपास आल्याचे दिसून येत आहे. तर, या आजाराने होणार्या मृत्यूंच्या संख्येत देखील घट होवून सह ते सात वर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सात हजार 416 रुग्णांची तर, 146 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसें दिवस जिल्ह्यात नव्याने दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Thane district on its way to corona free district Control the number of new patients 

---------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT