thane
thane 
मुंबई

चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, दिवसभरात इतके रुग्ण

सकाळवृत्तसेवा

ठाणे : मागील पाच ते सहा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत होणारी वाढ मंगळवारी मात्र काहीशी घटली असल्याचे दिसून आले. मंगळवारी नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रांसह ग्रामीण भागातील आकडेवारी चढीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात 171 रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा अडीच हजारांच्या पार गेला असून मृतांचा आकडा 69 वर गेला आहे.

मंगळवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 77 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 856 इतकी झाली. तर, ठाणे महापालिका क्षेत्रात 46 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 798 वर पोहोचला. उल्हानगरमध्ये तिघांची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 50 झाला आहे. तसेच कल्याण, डोंबिवलीत 21 रुगांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 365 इतका झाला. मीरा-भाईंदरमध्ये 5 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 262 वर गेला. भिवंडी महापालिका क्षेत्रात एका नवीन रुग्णाची नोंद झाली. बदलापूरमध्ये सहा नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 62 झाला असून मृतांची संख्या 2 झाली.

ठाणे ग्रामीण भागात 12 नव्या बाधितांच्या नोंदीसह एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दोन हजार 549 तर, मृतांचा आकडा 69 इतका झाला आहे.

In Thane district, the number of corona sufferers has crossed 2500, 171 patients in a day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT