मुंबई

हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाचा ठाण्यातून काढता पाय; रुग्णदुपटीचा कालावधी 889 दिवसांवर

राहुल क्षीरसागर

ठाणे  ः मागील काही महिन्यापासून हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ठाणे पालिका हद्दीत नियंत्रणात येताना दिसत आहे. ठाणे पालिका क्षेत्रात 31 डिसेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी 889 दिवसांवर गेला आहे. ठाणेकारांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या डिसेंबर महिन्यापासून अटोक्‍यात येत असल्याचे चित्र आहे. मागील 15 दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 431 दिवसांवर होता तो आता 31 डिसेंबरला 889 दिवसांवर पोहोचला आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या 300 वरून 100 च्या आसपास आली आहे. तसेच शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील उल्लेखनीय असून हा दर 96.25 टक्के असा आहे. 

ठाणे पालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून शहरात तीन महिन्यांपुर्वी कोरोना चाचण्यांची संख्या पाच हजाराहून अधिक करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला दररोज 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून रुग्ण संख्येत घट झाली आहे. आता रोज 80 ते 115 रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत आठ लाख 37 हजार 723 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून या सर्व चाचण्यांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. या चाचण्यांमध्ये आतापर्यंत 55 हजार 321 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 53 हजार 248 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचे प्रमाण 96.25 टक्के इतके आहे. तसेच शहरात आतापर्यंत एक हजार 247 रुग्ण मृत पावले आहेत. त्याचबरोबर शहरात केवळ आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या 826 एवढी आहे. ग्लोबल कोव्हिड सेंटरमध्ये आता बहुसंख्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसात हे प्रमाण आणखी खाली आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. 

235 जणांचा शोध लागला - 
दरम्यान, रुग्ण दुपटीचा कालावधी हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 299 दिवसांवर होता. परंतु 31 डिसेंबर अखेर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 899 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे युरोपीयन देशातून आलेल्या 235 जणांचा शोध लागला असून त्यातील काही जण पुन्हा ब्रिटनला गेले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, आता त्याची देखील फारशी भीती नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

In Thane The duration of the corona doubling was 889 days the number of patients decreased

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT