Thane Fire News sakal
मुंबई

Thane Fire News: रेतीबंदर घाटाजवळ कंटेनर कॅबिनला आग

Kalva News: पारसिक रेतीबंदराजवळील भीषण आगीत बकऱ्यांचा बळी; अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Kalva News: कळव्यातील पारसिक रेतीबंदर घाटाजवळ कंटेनरकॅबीन लागलेल्या आगीत 6 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार(ता 9)ला मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.या आगीत 5 किलो ग्रॅम वजनाचा सिलेंडरगॅस लाकडी फळ्या जळून नुकसान झाले आहे.

 कळव्यातील पारसिक रेतीबंदर घाटाजवळ अन्वरभाई कच्छी नावाच्या इसमाने कंटेनर कॅबीनमध्ये बकऱ्या पाळल्या होत्या.ह्या बकऱ्यांची देखभाल करण्याचे काम निर्मल महतो हा व्यक्ती करत होता.

तो त्या कंटेनर कॅबीन मध्येच झोपत होता गुरुवारी बकऱ्यांची देखभाल केल्यावर तो झोपी गेला .रात्री दोनच्या सुमारास अचानक केबिनला आग लागली.व प्रचंड आगीचा भडका उडाल्याने आपल्या बचावासाठी तो बाहेर पडला परंतु केबिनच्या आतमध्ये पाळलेल्या 6 बकऱ्या व केबिन मध्ये असलेले 3 कमर्शियल सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा 5 किलो ग्रॅम वजनाचा छोटा सिलेंडर व लाकडी फळ्या जळून खाक झाल्याआगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान,कळवा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

ही आग सिलेंडरचा स्फोट होऊन लागली असावी असा अंदाज प्रथमदर्शी उपस्थित असलेल्या या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.या संदर्भात कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT