Crime Sakal
मुंबई

ठाण्यात MIMच्या कार्यकर्त्यावर कार्यालयात घुसून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यावर १० ते १२ अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये एमआयएमचा एक कार्यकर्ता जबर जखमी झाला असून हल्लेखोरांकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अज्ञाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(Thane MIM Office Attack One Injured)

गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान १० ते १२ अज्ञात हातात रॉड, कोयते घेऊन मुंब्य्रातील एमआयएमच्या कार्यालयात घुसले आणि तिथे असलेल्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. बिलाल असं हल्ला झालेल्या तरूणाचे नाव असून सय्यद पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी हे गुंड आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर सय्यद पठाण यांनी पोलिसांत तक्रार दिली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दहा ते बारा अज्ञात हातात रॉड, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी कार्यालयात असलेल्या बिलाल या तरूणावर जीवघेणा हल्ला केला असून तो या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT