मुंबई

'या' कारणामुळे ठाणे पालिकेकडून तब्बल 2 हजारहून अधिक नळ जोडण्या खंडित

राहुल क्षीरसागर

मुंबई: ठाणे महानगर पालिकेने थकबाकीदारांवर कारवाईची बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने आतापर्यंत तब्बल दोन हजार 320 नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. तर 92 पंप रुमसील करण्यात आले आणि 383 पंप जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाणे महापालिकेच्या वतीने 2020 -21 या आर्थिक वर्षातील पाणी देयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत नळ संयोजन खंडित करु न, पाणी पुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्त करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासून थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करु न पाणी पुरवठा बंद करण्यात आला येत आहे. त्यानुसार सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यात दोन हजार 320 नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.

93 पंप रुम सील करण्यात आले आणि 383 पंप जप्त करण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी पाणी बिल एकरकमी भरणा करुन 31 जानेवारी पर्यंत मागील थकबाकीवरील 100 टक्के प्रशासकीय आकारामध्ये देण्यात येणा सवलतीचा लाभ घ्यावा आणि आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आली आहे. मात्र ज्यांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आलेले आहेत. त्यांनी परस्पर पुन्हा नळ जोडणी केली तर अशांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. 

हेही वाचा- कल्याण डोंबिवलीत घर घेताय? घर अधिकृत की अनधिकृत विचारा पालिकेला 
 
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु असून पुढे देखील ही कारवाई सुरुच राहणार आहे. 
विनोद पवार, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा.
 
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत सर्वाधिक एक हजार 22 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. त्या पाठोपाठ वागळे इस्टेटमध्ये 389, कोपरी (उप विभागात) 245, दिवा प्रभाग समितीत 234, कळाव्यातील 181, वर्तक नगर येथील 70, उथळसरमध्ये 57, लोकमान्य नगरात 49 आणि माजिवडा- मानपाडामध्ये 33 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane Municipal Corporation disconnects more than 2 thousand taps

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT