संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुंबई

लॉकडाऊन पाळा... पन्नास लाख जिंका!

सकाळवृत्तसेवा

ठाणे ः लॉकडाऊन पाळा... पन्नास लाख जिंका, अशी बक्षीस योजना ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. ठाण्यातील कोरोनाची साथ कमी करण्यासाठी योजना जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रयत्न करण्यात येत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे विविध विभाग आणि महापालिकेच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचे सर्वतापेरी प्रयत्न अत्यावश्‍यक आहेत. त्यासाठीच राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून "माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग' स्पर्धा होणार आहे. प्रत्येक प्रभागाबरोबरच शहर कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने ठाणे महापालिकेतर्फे स्पर्धा होत आहे. 

भयानक ः मुंबईतील सर्वाधिक सेफ झाेन होतोय डेंजर झोन...

लॉकडाऊनचे नियम 80 टक्के नागरिक पाळत आहेत, पण उर्वरित 20 टक्क्यांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आम्ही विविध उपाय करीतच आहोत, पण आता लॉकडाऊनचे नियम पाळणाऱ्यांसाठी आम्ही खास बक्षीस देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्ही प्रभागनिहाय स्पर्धा घेतली असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

लिंकवर नावनोंदणी आवश्यक
स्पर्धा एका महिन्यासाठी असेल. ज्या प्रभागात एकही कोरोना रुग्ण आढळणार नाही. सर्व कोरोना रुग्ण बरे होतील त्यांच्यासाठी खास स्पर्धेसाठी 2 ते 15 मे आणि 2 ते 29 मे अशी तारीख विचारात घेतली जाईल. जूनमध्ये काही ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 1 ते 14 जून आणि 1 ते 28 जूनपर्यंत प्रभाग समिती क्षेत्रातील रुग्णांची संख्या विचारात घेतली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना "डीजी ठाणे'च्या https://www.research.net/r/NDW7MSL लिंकवर नाव नोंदवणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये प्रभागनिहाय प्राथमिक माहिती नोंदवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मोबाईलवरून लिंकद्वारे जोडता येत नाही, अशा नागरिकांना एसएमएसद्वारे 9819170170 क्रमांकावर माहिती पाठवणे आणि नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

Breaking : मुंबईतील पोलिस उपायुक्ताला कोरोनाची लागण

बक्षिसाच्या रकमेतून प्रभागात विकासकामे

सहभागी होणाऱ्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही लिंकवर कार्यकर्ते म्हणून नोंद करावी. 2 ते 14 मेदरम्यान एकही रुग्ण न आढळलेल्या प्रभागांना 25 लाखांचे बक्षीस असेल. 2 ते 29 मेदरम्यान एकही रुग्ण न आढळणाऱ्या प्रभागांना 50 लाख देण्यात येतील. बक्षीस रकमेचा उपयोग प्रभागांतील विकास कामांसाठी करण्यात येईल. विजेत्या प्रभागामध्ये  काम करणाऱ्यांना कोरोना फायटर्सचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. बक्षीस देताना लॉकडाऊनचे कसे पालन झाले हेही बघण्यात येईल. त्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत काम करणाऱ्यांना प्रभागामधील नागरिक कशी साथ देतात त्यालाही महत्त्व देण्यात येणार आहे.  प्रभागात जागृती करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची असेल. 

बोंबला : ७ कोटींचे दागिने आणि पोलिस काॅन्स्टेबलच गजाआड

वैयक्तिक स्पर्धाही होणार

ठाणे महापालिकेने वैयक्तिक स्पर्धाही जाहीर केल्या आहेत. त्यात घरातील सेल्फी, आपल्याला कोरोना झाला असल्यास ते जाहीर करणे, सुरक्षित अंतर राखण्याची वैयक्तिक स्पर्धा आणि त्यासाठी सोसायटीत केलेले उपाय अशीही स्पर्धा असेल. नगरसेवक, समाजातील अन्य प्रतिष्ठित, नामांकित व्यक्ती, विविध पक्षांतील कार्यकर्ते, मित्रमंडळ, सामाजिक संघटना आदींचा कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीमध्ये सहभाग आवश्‍यक आहे. संबंधित नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या केलेल्या जनजागृतीच्या कामाची माहिती लिंकवर पाठवल्यास त्याचा स्पर्धेमध्ये विचार केला जाईल.

स्पर्धेसाठीच्या लिंक 

  • कवच नोंदणी ः httpsः//bit.ly/rKTMC 
  • कोव्हिडच्या खबरदारीविषयी सेल्फी स्पर्धा ः https ://bit.ly/SeKch 
  • डीजी ठाणे ऑप ः httpsः//bit.ly/ThDig 
  • सेल्फ असेसमेंट लिंक ः https://bit.ly/TMCaa 
  • व्हिडीओ पाठवण्यासाठी डीजी ठाणेचा व्हॉटस्‌ऍप क्रमांक ः 91-9819170170 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT