covid 19 test 
मुंबई

कोव्हिड-19 चाचण्या वाढवण्यासाठी ठाणे पालिका राबवणार 'ही' विशेष योजना

राजेश मोरे

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात कोव्हिड-19 च्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बाईक ऍब्युलन्सचा वापर आता अँटीजेन चाचणीसाठी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत अँटीजन टेस्टीग सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. तथापि चाचण्यांची संख्या वाढावी या दृष्टीकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या ऍम्ब्युलन्सचा विनियोग अँटीजन टेस्टींगसाठी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.

आजमितीस आरोग्य विभागाकडे एकूण 17 बाईक ऍम्ब्युलन्स उपलब्ध असून या ऍम्ब्युलन्स प्रभागसमितीनिहाय वितरित करण्यात येणार आहेत. याबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांना या बाईक ऍम्ब्युलन्सचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बाईक ऍम्ब्युलन्सचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याचा निर्णय प्रभाग समिती स्तरावर घेण्यात येणार असून सदर बाईक ऍम्ब्युलन्स मोठी निवासी संकुले, मार्केट आदी ठिकाणी वापरण्यात येणार आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

thane municipality came up with a special idea to increase the tests of Covid 19

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT