मुंबई

ठाणे पालिका करते पुन्हा पुन्हा तीच चूक !

शर्मिला वाळुंज

ठाणे : अत्याधुनिकतेची कास धरणारी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे संकेतस्थळही अपडेट ठेवण्यावर कायम भर देते, परंतु संकेतस्थळावर माहिती अपडेट करताना ती पूर्ण केली जाते का, याकडे गांभीर्याने पालिका लक्ष देताना दिसत नाही.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यात भरवण्यात येणाऱ्या वृक्षवल्ली प्रदर्शनाची जाहिरात संकेतस्थळावर नुकतीच अपडेट करण्यात आली आहे, परंतु मुख्य पहिल्या पानावर २०२० च्या प्रदर्शनाची जाहिरात; तर कार्यक्रम विभागात २०२० च्या प्रदर्शनाची माहिती आहे; मात्र जाहिरात २०१९ च्या प्रदर्शनाची देण्यात आली आहे. मागील वर्षीही २०१४ च्या प्रदर्शनाची जाहिरात संकेतस्थळावर झळकत असल्याचे सकाळ वृत्तपत्राने उघडकीस आणल्यानंतर ही जाहिरात बदलण्यात आली, परंतु यंदाही पालिकेने तीच चूक पुन्हा केल्याचे संकेतस्थळावर दिसून येत आहे.

ठाणे महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने १० ते १२ जानेवारी २०२० या कालावधीत वृक्षवल्ली प्रदर्शन रेमंड मैदान येथे भरवण्यात येणार आहे. कार्यक्रमांची माहिती नागरिकांच्या नजरेस पडावी यासाठी संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरच्या मथळ्याच्या जागी सतत जाहिरात सुरू असते. या ठिकाणी २०२० च्या कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे.

तसेच मुखपृष्ठावरच कार्यक्रमांची माहिती समजण्यासाठी कार्यक्रम म्हणून स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे.त्यामध्ये वृक्षवल्ली प्रदर्शन २०२० अशी माहिती देण्यात आली असून या माहितीवर क्‍लिक केल्यानंतर सुरुवातीला माहिती यंदाच्या कार्यक्रमाची, परंतु जाहिरातीचे पोस्टर मात्र २०१९ च्या ११ व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT