Thane party crime 
मुंबई

Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

On birthday three friend thrown birthday boy: कार्तिक वायाळ (वय २३) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा २७ जूनला वाढदिवस होता.

कार्तिक पुजारी

उल्हासनगर, (वार्ताहर): मद्यधुंद 'बर्थ डे बॉय'ने मित्राकडे आणखी दारू मागितल्याने झालेल्या वादातून तीन मित्रांनी मिळून त्याला चौथ्या मजल्याच्या खिडकीतून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र चौकशीअंती हत्येचा उलगडा झाला असून त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.

कार्तिक वायाळ (वय २३) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचपाडा परिसरात राहणारा कार्तिक वायाळ याचा २७ जूनला वाढदिवस होता. प्रथम एका ठिकाणी सेलिब्रेशन झाल्यावर आर्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नीलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत पार्टी सुरू राहिली.

दारूची झिंग चढलेल्या कार्तिकने पुन्हा दारूची मागणी केली. त्यावर आपण खूप मौज केली आहे, आता दारू नको, असे कार्तिकला समजावण्यात आले; पण राग आलेल्या कार्तिकने नीलेशच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. या प्रकाराने संतप्त झालेल्या नीलेश क्षीरसागर, सागर काळे, धीरज यादव या तिघांनी कार्तिकला जबर मारहाण केली आणि चौथ्या मजल्याच्या खिडकीतून खाली फेकून दिले. त्यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी सुरुवातीला विठ्ठलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सखोल तपास केला असता कार्तिकची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

दोन दिवसांत उलगडा

कार्तिकचे वडील नामदेव वायाळ यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांच्याविरोधात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या टीमने या घटनेचा उलगडा अवघ्या दोन दिवसांत केला. पुढील तपास उपनिरीक्षक टी. एन. खळडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT