Raj Thackeray addressing the crowd at the Dasara Melava 2024, celebrating Maharashtra's rich culture and heritage. Esakal
मुंबई

Raj Thackeray Dasara Melava 2024: पुढच्या महिन्यापर्यंतच पैसे येतील, नंतर येणार नाहीत"; 'लाडकी बहीण'बाबत राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

Raj Thackeray speech at Dasara Melava 2024: राज ठाकरे यांनी या मेळव्यात विधानसभा निवडणूक, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाष्य केले.

आशुतोष मसगौंडे

Raj Thackeray Dasara Melava 2024 details:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळव्यात राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा करत पुढील काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद होणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी या मेळव्यात विधानसभा निवडणूक, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाष्य केले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, लाडकी बहण योजनेद्वारे पैसे वाटत आहेत. कोणी मागितले पैसे? हे पैसे पुढच्या महिन्यापर्यंत येतील मग पुढे नाहीत येणार. कारण पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतील. हे असे पैशे वाटण्यापेक्षा महिलांना सक्षम बनवा त्यांना काम द्या, त्यांना पैसे कमवू द्या, फुकट कसले पैसे देतात? बेरोजगारांना पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज हे काय सुरू आहे. शेतकरी म्हणतो की, थोडे पैसे कमी घ्या पण वीज तर द्या. नीट पहा काय चालू आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT