डिजिटल शाळा sakal
मुंबई

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा मागतेय आर्थिक मदत

शाळेत विविध स्पर्धा, उपक्रम, बौद्धिक परीक्षा, घेतल्या जात असल्याची माहिती बालक मंदिर संस्थेकडून देण्यात आली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कोरोनामुळे नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पालकांना मुलांची शाळेची फी भरनेही मुश्किल झाल्याने मुलांचे शिक्षण आज पणाला लागले आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये व पालकांवरही ताण येऊ नये म्हणून कल्याण मधील बालक मंदिर संस्थेने शाळेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. कल्याण मधील इंदूताई देवधर यांनी 1949 साली पावलेले शिक्षणाचे रोपटे म्हणजे बालक मंदिर संस्थेची इंग्रजी माध्यमाची माध्यमिक शाळा. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. इंग्रजी माध्यम शाळेत सुरू झाले असले तरी शाळेत संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची जपणूक केली जात आहे. उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे हेच शाळेचे ध्येय असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध स्पर्धा, उपक्रम, बौद्धिक परीक्षा, घेतल्या जात असल्याची माहिती बालक मंदिर संस्थेकडून देण्यात आली. (KDMC News)

गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पगारात कपात झाली आहे. या आर्थिक संकटामुळे घरखर्च भागवणे, मुलांची शाळेची फी भरणे अनेक पालकांना जमत नाही आहे. फी न भरल्यामुळे मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद झाल्याच्या घटनाही घडत आहेत. परंतु आपल्या शाळेतील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा खर्च उचलण्यासाठी शाळेनेच दात्यांना आवाहन केले आहे.

पालकांसमोरील आर्थिक संकटामुळे त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे विद्यार्थी हुशार असल्याने त्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेतर्फे मदत केली जात असली तरी अद्यापही आणखी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळेतील माजी विद्यार्थी, समाजातील दानशूर व्यक्ती, हितचिंतक आदींनी या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून पुढे येण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यासाठी शाळेतील भाग्यश्री कुलकर्णी व त्रिवेणी शिंपी यांच्याकडे संपर्क साधावा असेही संस्थेने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT