mumbai sakal
मुंबई

नाशिक एफआयआर प्रकरणात तूर्तास कारवाई करणार नाही : राज्य सरकार

नारायण राणे यांच्यावर नाशिक एफआयआर प्रकरणात तूर्तास कारवाई करणार नाही,राज्य सरकार

- सुनीता महामुणकर

मुंबई : मुख्यमंत्री (Cm) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर नाशिक एफआयआर प्रकरणात तूर्तास कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारने (State Government) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली.

राणे यांच्या कानफटवणार्या विधानाविरोधात राज्यात अनेक फौजदारी फिर्यादी दाखल होत आहेत. मंगळवारी महाड न्यायालयाने त्यांना रात्री उशिरा सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणे यांच्या वतीने एड सतीश मानेशिंदे आणि एड अनिकेत निकम यांनी महाड, नाशिक आणि पुणे येथील एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात आज सकाळी कागदपत्रांसह रिट फौजदारी याचिका दाखल केली. पोलिसांनी चुकिची कलमे लावली आहेत, त्यामुळे हे गुन्हे रद्दबातल करावे आणि कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.

अद्याप अन्य गुन्ह्याची कागदपत्रे राणे यांना मिळालेली नाही. त्यामुळे याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. राणे यांना सुसाट विधाने आणि क्रुती करण्यासाठी मनाई करावी अशी मागणी सरकारी वकील अमित देसाई यांनी केली. मात्र यामुळे राणे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा येत आहे, तसेच महाड न्यायालयाने यावर निर्देश दिले आहेत असा खुलासा राणेंच्या वतीने करण्यात आला.

न्या एस.एस शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकेवर पुढील सुनावणी ता. 17 सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे. राज्य सरकारने नाशिक गुन्ह्यात कारवाई न करण्याची हमी दिली असली तरी अन्य गुन्ह्यात आवश्यकता वाटल्यास राज्य सरकार कारवाई करु शकते. तसेच राणेदेखील त्यावेळी न्यायालयात दाद मागू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT