kishori pednekar esakal
मुंबई

शव विच्छेदन ऐवजी शवचिकित्सा शब्दप्रयोग हवा; शिवसेना नगरसेवकाची महापौरांकडे मागणी

एखादी मृत झाल्यावर शवाचे परीक्षण किंवा निदान करण्यात येते.

भाग्यश्री भुवड

मुंबई : शवविच्छेदन प्रक्रिया(post mortem ) शवाचे परीक्षण किंवा निदान करण्यात येते. यासाठी शवचिकित्सा हा शब्दप्रयोग योग्य आहे. शवाचे विच्छेदन हा शब्दप्रयोग नकारात्मक भिती निर्माण करतो. त्यामुळे वैद्यकीयशास्त्रामध्य शास्त्रीय पद्धतीने मृत्यूचे कारण तपासण्यासाठी शवाचे परिक्षण केले जाते या प्रक्रियेला शव विच्छेदन हा शब्दप्रयोग न करता शवचिकित्सा हा शब्दप्रयोग करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

यासाठी वैद्यकीय विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा असे ही पडवळ यांनी निवेदनपत्रात म्हटले आहे. एखादी मृत झाल्यावर शवाचे परीक्षण किंवा निदान करण्यात येते. या प्रक्रियेसाठी आता पर्यंत शवविच्छेदन हा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. मात्र यासाठी शवचिकित्सा हा शब्दप्रयोग योग्य असून शवाचे विच्छेदन हा शब्दप्रयोग नकारात्मक भिती निर्माण करत असल्याची भावना लोकमानसात असल्याचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

वैद्यकीयशास्त्रात (health )शास्त्रीय पद्धतीने मृत्यूचे कारण तपासण्याच्या प्रक्रियेला शवचिकित्सा हा शब्दप्रयोग करावा अशी मागणी पडवळ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. केईएम रुग्णालयाचे(kem hospital) न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. रविंद्र देवकर यांनी ही यासाठी पुढाकार घेतला होता.

यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, नगरसेविका सिंधुताई मसुरकर व उर्मिला पांचाळ तसेच नगरसेवक समाधान सरवणकर उपस्थित होते. यावर संबंधित अधिकारी व डॉक्टर यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महापौर किशोरीताई(kishori pednekar) यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT