mumbai sakal
मुंबई

तिसरी लाट येणं हे नागरिकांवर अवलंबून !

पुढील महिना महत्त्वाचा असल्याचा टास्क फोर्सचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना (Corona) अद्याप गेला नसून कोरोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण (Patient) अधूनमधून आढळत आहेत. त्यामुळे कोरोना (Corona) प्रतिबंधक उपाययोजनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास तिसरी लाट (Third wave) लवकर येऊ शकते. त्यामुळे पुढील महिनाभराचा काळ महत्त्वाचा असल्याचे राज्य कोविड टास्क (Covid Task) फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे (Avinash Supe) यांनी स्पष्ट केले.

१५ ऑगस्टपासून मुंबईत दोन डोस घेतलेल्यांना देण्यात आलेली लोकल प्रवासाची सवलत ही नोकरी-व्यवसायाकडे पाहून देण्यात आली आहे. कामाव्यतिरिक्त लोकलने फिरण्यातून कोरोनाचा संसर्ग लाटेत रूपांतरित होऊ शकतो. दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. असे असले तरी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. सध्याची वाढलेली गर्दी पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ही गर्दी आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे पुढील महिनाभर सणासुदीच्या काळात नागरिकांनी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. सुपे म्हणाले.

सणासुदीत खबरदारी महत्त्वाची

सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सात ते आठ जिल्ह्यांत अद्यापही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यातच आगामी गौरी-गणपतीसारख्या सणासुदीच्या काळात खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT