मुंबई

स्मारकाची उंची वाढवण्यासाठी पैसे आहेत, वाडिया रुग्णालयासाठी पैसे नाहीत का?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाडिया रुग्णालायाला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. स्मारकांच्या उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र वा़डिया ट्रस्ट रुग्णालयाला देण्यासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे.

काही दिवसांपासून अनुदानाच्या मुद्दावरून वाडिया रूग्णालय आणि मुंबई महापालिकेमध्ये वाद सुरू आहेत. अनुदान मिळत नसल्याने रूग्णालय बंद करण्याची वेळ ट्रस्टवर आली होती. त्यामुळे दिपक सिसोदीया या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिसोदीया यांनी याचिकेत हे रूग्णालय वाचवे. तसेच ह्या रुग्णालयाच्या सेवा पुर्वरत व्हाव्या असा आशय मांडला होता. महापालिकेकडून 14 कोटी आणि राज्यसरकारकडून 24 कोटीचा निधी रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आला होता. परंतु हा निधी अद्याप ट्रस्टला मिळालेला नाही. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत, तुम्ही हे पैसे ट्रस्टला कधी देणार असा सवाल याआधी केला होता.

आजही न्यायालयाने हा प्रश्न विचारल्याने त्यावर सरकारकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. एकीकडे प्रस्तावित स्मारकांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत. आणि रुग्णसेवेसाठी पैसे नाहीत का? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. सर्वसामान्य लोकांच्या जगण्याशी संबधीत मुद्द्यांना प्राधान्य द्या तसेच 24 तासात हा निधी ट्रस्टला मिळवून द्या असेही न्यायालयाने म्हटले आहे. असे न झाल्यास संबधित अधिकाऱ्यांची आम्ही न्यायालय़ात परेड घेऊ असेही न्यायालयाने म्हटले आहे. 


त्यानंतर, सरकारी पक्षाच्या वतीने 24 तासाच्या आत रूग्णालयाला पैसे मिळतील अशी शाश्वती न्यायालयात देण्यात आली आहे. त्यासंबधी लागणारे सर्व दस्ताऐवज उद्या (शुक्रवारी) न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT