train 
मुंबई

हृदयद्रावक! उपाशी राहून केला ६० तासांचा प्रवास, अखेर भुकेमुळे निधन; श्रमिक ट्रेनमधलं दुर्दैवी वास्तव..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: श्रमिक स्पेशलवरुन राजकारण सुरु असताना या ट्रेन वाढवल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत. त्यातच एका प्रवाशाचा भुकेमुळे बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुंबईहून निघालेल्या या स्थलांतरीत कामगाराचे वाराणसी येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर निधन झाले. 

आपले 46 वर्षीय काका जोखन यादव यांचे भूकेमुळे निधन झाल्याचा आरोप त्यांच्यासह प्रवास केलेल्या रवीश यादव याने केला आहे. त्याने प्रवासात आम्हाला खायला - प्यायला काहीच मिळाले नसल्याचाही आरोप केला आहे. हे दोघे बांधकाम मजूर उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर या आपल्या गावी निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ते प्रवास करीत असलेली श्रमिक स्पेशल 20 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता निघाली आणि ती वाराणसी कँटोनमेंटला 23 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पोहोचली. 

"माझ्या काकांना प्रवासात काहीही न मिळाल्याचा त्रास होत होता. त्यांना कमालीच्या वेदना होत होत्या. वाराणसीला ट्रेन पोहोचण्यापूर्वी अर्धा तास ते चक्कर येऊन पडले आणि काही मिनिटातच निधन झाले. रेल्वेच्या प्रवासात जेवणाची पाकिटे देण्यात येतील. तसंच पाणी देण्यात येईल असे आम्हाला सांगण्यात आले होते, पण आमच्या बोगीत काहीच मिळाले नाही. आमच्या बोगीतील अन्य प्रवाशांनी खायला तसेच प्यायला काहीच न मिळाल्याची तक्रार केली, पण कोणीच आम्हाला मदत केली नाही. ट्रेनमध्ये पाणीच नव्हते, ", असे रविशने वाराणसीतील पत्रकारांना सांगितले. 

रेल्वे आधिकाऱ्यांनी रविशच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. रेल्वे पोलिसांनी शव ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हृदयविकाराचा त्रास होता असे सांगितले. त्यामुळे त्यांचे निधन झाले असावे असे वाराणसीचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवीप्रकाश चतुर्वेदी यांनी सांगितले. रवीशला हे मान्य नाही. माझ्या काकांना हृदयविकाराचा त्रास होता, पण 60 तास काही खायला न मिळाल्यानेच त्यांचे निधन झाल्याचा आरोप केला.

रवीशने याबाबत 20 मे या दिवशीच प्रवास सुरु झाल्यानंतर ट्वीट केले होते. हे ट्वीट रिट्वीट होत असल्याचे बघितल्यावर रेल्वे प्रशासनाने ट्रेन नंबर आणि तिचे सध्याचे लोकेशन कळवण्यास सांगितले. त्याचवेळी रेल्वेने बिंदाचल स्टेशनच्या व्यवस्थापकांना याबाबत लक्ष देण्यास सांगितले. मात्र त्यानंतर रवीशने आपले काका भूकेमुळे गेल्याचे ट्वीट केले आणि त्यासोबत ही श्रमिक ट्रेन नसून मौत का सफर असल्याचे म्हंटले.  

स्थलांतरीत कामगारांच्या प्रवासाचा खर्च करीत असल्याचे विविध सरकारकडून सांगण्यात येते. मात्र रवीशने आपण 940 रुपये देऊन आपले तसेच काकांसाठी तिकीट काढल्याचे सांगितले. आम्ही स्टेशनवर पोहोचलो, त्याचवेळी काकांनी भूक लागल्याचे सांगितले. मी कुठे काही खायला दिसते का ते पाहिले, पण काहीच मिळाले नाही. त्यानंतर ट्रेन कटनी (मध्य प्रदेश) येईपर्यंत थांबलीच नाही. तिथे तीन तास थांबली. त्याच नाही तर त्यानंतरच्या अनेक स्टेशनवर रेल्वे पोलिसांना आम्ही खायला द्या, पाणी द्या अशी विनंती केली. पण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी आम्हाला ट्रेनमधून उतरुही दिले नाही. उतरलो तर लाठ्यांनी मारत असत, असा आरोपही रवीशने केला.  

अनेक गोंधळ सुरुच:

रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचा फटका मुंबईहून जौनपूरला आलेल्या श्रमिक स्पेशलमधील कामगारांना बसला. ही ट्रेन काशी स्टेशनला दुपारी 1.30 वाजता पोहोचली होती. तेथून जौनपूर 40 किमी दूर होते, पण ट्रेन सात तास थांबवण्यात आली. ट्रेन येणार असल्याचे कळवलेच नव्हते. ट्रेन येणार हे समजल्यावर आम्ही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बसची व्यवस्था करतो. काही तासात हजारो प्रवाशांसाठी बसची व्यवस्था कशी करणार अशी विचारणा करण्यात आली. जौनपूरला व्यवस्था होणार नाही हे लक्षात आल्यावर ही ट्रेन मुगलसरायला नेण्याचे ठरले. ती रात्री 9.30 वाजता पोहोचली. रेल्वे आधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी होईल एवढेच सांगितले.

there is no water and food provided by government in shramik special train

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT