मुंबई

पीएमसी प्रकरणातील आरोपींवरील कलमे वाढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील ६ हजार ६७० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी व बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी बनावट खाती तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आणखी काही कलमे समाविष्ट केली जाण्याची शक्‍यता आहे.

या गैरव्यवहारातील रकमेच्या हस्तांतरासाठी ऑनलाईन यंत्रणेचा वापर झाल्याचा संशय आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाल्यास आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यातील कलम लावण्यात येण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पीएमसी बॅंक प्रकरणात दाखल होणाऱ्या अंतिम आरोपपत्रात थॉमस यांच्या विरोधात काही अतिरिक्त आरोप ठेवण्यात येणार आहेत. त्यात बनावट खाती उघडल्याबद्दल भारतीय दंड विधानातील कलम क्र. ४७७ (अ) समाविष्ट केले जाऊ शकते. या गुन्ह्यात सात वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. गैरव्यवहाराची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी बॅंक यंत्रणेचा वापर झाल्याचा संशय आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप आर्थिक गुन्हे शाखेला मिळालेला नाही. ऑनलाईन यंत्रणेचा गैरवापर झाल्यास माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यातील कलमेही लावली जातील, असे सूत्रांनी सांगितले. 

web title : There is a possibility of increasing the inclination of the accused in the PMC case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT