मुंबई

"कोरोना संपल्यावर काँग्रेसमध्ये येणार ३ मोठे भूकंप", चंद्रकांत पाटीलांचा मोठा गौप्यस्फोट

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाच्या संवेदनशील वातावरणात देखील महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहिलंय मिळतंय. याला कारण ठरतेय ती महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक. आधी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून करण्यात आलेला राज्यपालांसोबतचा पत्रव्यवहार त्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस किती जागा लढवणार यावरून पुढे आलेलं नाराजीनाट्य आणि आता भाजपच्या विधान परिषदेच्या तिकिटांवरून जुने जाणते नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाविरुद्ध पुकारलेला एल्गार. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच ढवळून निघालंय. 

"कोरोनानंतर काँग्रेसमध्ये येणार ३ मोठे राजकीय भूकंप"

भाजपच्या विधान परिषेदेच्या तिकीट वाटपावरून जेष्ट भाजप नेते एकनाथ खडसे पक्षावर चांगलेच नाराज झालेत. पक्षाने पाठीत खंजीर खुपसला असं देखील त्यांनी विधान केलं. काँग्रेसने हीच वेळ साधत एकनाथ खडसे यांना काँग्रेसकडून विधान परिषदेच्या तिकीटाची ऑफर देखील दिली. एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आलेत तर आनंद होईल असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. अशात एकनाथ खडसे यांच्या नाराजीवर आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलंय. त्यांची वयक्तिक भूमिका मांडली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवर बोलताना चंद्रकांत पाटीलांनी काँग्रेच्या एकनाथ खडसे यांना काँग्रेसमध्ये येण्याच्या ऑफरवर देखील टीका करत मोठा गौप्यस्फोट केलाय. 

काय म्हणालेत चंद्रकांत पाटील ?

"कोरोना संपल्यावर काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर काय भूकंप होणार आहे याची थोडी हालचाल बाळासाहेब थोरातांना कळली आहे. कोरोना संपल्यावर काँग्रेसमध्ये खूप मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची स्वतःची माणसं जपावीत असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिलाय. कोरोना संपल्यावर काँग्रेसचे दोन तरुण कार्यकर्ते आणि एक जेष्ट कार्यकर्ता हा भाजपमध्ये येणार आहे. देशात तीन राजकीय भूकंप हे पूर्वतयारीत आहेत आणि महाराष्ट्रात असंख्य भूकंप तयारीत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.  

there will be big earthquake in national congress say bjp maharashtra prez chandrakant patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT