मुंबई

'ई- पास' साठी पोलिसांची अशी आहे नियमावली, जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपायला केवळ तीन दिवस बाकी आहेत. गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त असून मुंबईत त्याचा फैलाव जास्त झाला आहे. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत. पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे बरीच लोकं वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथील करण्यात आले. त्यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. त्यासाठी ई पासची सेवा सुरु केली आहे. 

सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ई पास दिला जात आहे. दरम्यान पोलिसांननी यासाठी एक नियमावली तयार केली आहे. जाणून घेऊया त्या नियमावलीबद्दल.

आपात्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रा बाहेर प्रवास करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण http://covid19.mhpolice.in  वर E-Pass साठी अर्ज करू शकता.

पास केवळ अत्यंत आपात्कालीन परिस्थितीतच देण्यात येईल.

  • http://covid19.mhpolice.in वर जा. 
  • संकेतस्थाळावर गेल्यानंतर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल.
  • तिथे सर्व तपशील योग्य पद्धतीनं भरा आणि संबंधित कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती दिल्यानंतर  Submit वर क्लिक करा. प्राप्त झालेला Token ID सेव्ह करुन ठेवा. 
  • http://covid19.mhpolice.in वर आपण पासची स्थिती तपासू शकता आणि पास मंजूर झाल्यावर तो डाऊनलोड करु शकता. 

हा फॉर्म केवळ इंग्रजी भाषेतच भरावा लागणार आहे.  सर्व कागदपत्रांची एकच फाईल तयार करावी लागेल. तुमचा ई पास मिळाल्यानंतर त्याची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ प्रवास करताना ठेवा.

पाससाठी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज करु नका. तुम्हाला मिळालेला Token ID सेव्हा करायला विसरु नका. तसंच अधिकृततेशिवाय वैधतेपलिकडं हा पास वापरू नका, असं पोलिसांनी आपल्या नियमावलीमध्ये म्हटलं आहे.

ऑफलाईन ई पास मिळवण्याची प्रक्रिया

  • ऑफलाईन ई पास मिळवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तु्म्हाला अर्ज करावा लागेल. 
  • सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार, त्या प्रत्येकाची नावं, मोबाईल नंबर, पत्ता, पॅनकार्ड किंवा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रं, कोणत्या वाहनाने जाणार त्याची माहिती त्या अर्जात भरावी लागणार आहे.
  • यात बसची व्यवस्था स्वत:च करायची आहे. तसेच बसमधून केवळ 22 लोकांनाच जाता येणार आहे. बससाठी पैसे जमा करूनही बसची व्यवस्था झाली नाही तर पोलिसच स्वत: बसची व्यवस्था करून देताहेत. 

या संपूर्ण प्रक्रियेतून पार पडल्यानंतरच पोलिसांकडून ई-पास दिला जातो. त्याशिवाय ई-पास दिला जात नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील लोकांना ई-पास दिला जात नाही. तसंच कंटेन्मेंट झोनमधील नसलेल्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे, जर तो परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असेल तर पास मिळत नाही. शिवाय ज्या गावाला जाणार आहात, त्या गावच्या प्रमुखाची एनओसीही आवश्यक आहे.

these are ruples and regulation for getting e pass read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT