thief threatened to rob elderly residents knife police custody mumbai police sakal
मुंबई

Mumbai News : जेष्ठ नागरिकांना धक्का मारत, चाकूचा धाक दाखवून लुटणार सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात

कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना धक्का मारत त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एक सराईत चोरट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. शाहिद बेरिंग असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.

कल्याण पश्चिमेत राहणारे 60 वर्षीय अब्दुल हमीम गणी शेख हे रात्रीच्या सुमारास पायी घरी चालत जात होते. यावेळी आरोपी शाहिद बेरिंग याने गणी यांना जाणूनबुजून धक्का देत मारहाण केली. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेला मोबाईल आणि रोख रक्कम असा 24 हजाराचा मुद्देमाल काढून घेत पसारा झाला.

या प्रकरणी अब्दुल गणी शेख यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय प्रदीप पाटील,

सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, भालेराव, पोलीस हवालदार चिते,कांगरे,थोरात,धाम्हणे या टीमने तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनाला प्रमाणे परिसरात सर्च ऑपरेशन करत 24 तासाच्या आत कल्याण पश्चिम परिसरात सापळा रचून आरोपी शाहिद बेरिंग याला अटक केली.

त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शाहिद हा सराईत आरोपी असून त्याच्यावर ठाणे जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या शाहिद महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अजून किती गुन्हे केले आहेत व त्याचबरोबर कोण सहभागी आहेत याचा तपास महात्मा फुले पोलीस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT