file photo 
मुंबई

करणार होता प्लास्टिक सर्जरी; आता तुरुंगात होतेय चौकशी! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भुरट्या चोऱ्या करणाऱ्या समीर मुकर्रम शेख ऊर्फ "चिरा'च्या हाती 23 डिसेंबर रोजी अक्षरश: घबाड लागले. रिक्षामधून एका महिलेची बॅग पळवून फरार झाल्यानंतर त्यात 17 तोळे सोन्याचे दागिने सापडल्याने समीरची चांदी झाली होती. त्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आणि चेहऱ्याबाबत लोकांचे कायमचे टोमणे ऐकून कंटाळलेल्या "समीर चिरा'ने चोरीच्या दगिण्यांमधून आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्याचे ठरवले. मात्र, त्याआधीच पोलिसांनी माग काढत त्याच्या मुसक्‍या आवळल्या.
 
हेही वाचा : बाजारात आलाय `बाहुबली` कांदा, एका कांद्याचं वजन आहे...

दिंडोशी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय जाधव, योगेश कानेरकर आदींच्या पथकाने समीर शेखला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी गोरेगाव पश्‍चिमेतील एस. व्ही. रोड परिसरातून सरिता मोरे रिक्षाने प्रवास करीत होत्या. ओबेरॉय मॉलजवळील सिग्नलवर रिक्षा थांबली असता समीरने दुचाकीवर येत त्यांची बॅग घेऊन पोबारा केला. सरिता यांनी तातडीने दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

#SakalImpact​ - धडपड्या संताेषच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप...

पोलिसांनीही गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी दुचाकीस्वारांचा माग काढला. दुचाकीस्वार मालाड मालवणी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी मालवणीतून "समीर चिरा'ला गेल्या आठवड्यात अटक केली. त्याच्याजवळ चोरी केलेल्या 17 ऐवजी 14 तोळे सोने सापडले. उर्वरित सोने साथीदार घेऊन गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. चोरीच्या गुन्ह्यावरून समीर सध्या तुरुगांत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. 

वाचायलाच हवं : तब्बल 14 वर्षांनंतर `ती` पुन्हा येेतेय...​

...म्हणून करणार होता प्लास्टिक सर्जरी 
वर्षभरापूर्वी झालेल्या एका हाणामारीदरम्यान आरोपी समीर शेखच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार झाला होता. त्याच्या खुणा चेहऱ्यावर पडल्याने त्याला "समीर चिरा' असेच नाव पडले. त्याच नावाने त्याची हेटाळणी व्हायची. म्हणून तो वैतागला होता. त्याशिवाय छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांचीही त्याच्यावर सतत नजर असे. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्याचे समीरने ठरवले होते. अशात चोरीमध्ये सोन्याचे दागिनेही त्याच्या हाती आले होते; मात्र त्याआधीच पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT