mobile theft
mobile theft 
मुंबई

जरा जपूनच ! अनलॉकनंतर मोबाईल चोर सक्रिय

दीपक शेलार : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून गायब झालेले मोबाईल चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोघांच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकल्याच्या दोन घटना घोडबंदर रोडवरील आर मॉलनजीक घडल्या. या दोन्हीप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठाणे पश्चिमेकडील मनोरमानगरमध्ये राहणारा साहिल पांडे (22) हा तरुण घोडबंदर रोडवरील आर मॉल जवळील टीएमटी बस थांब्यावर बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना 25 जुलैला पहाटे 6 च्या सुमारास घडली. तर, दुसऱ्या घटनेत मानपाडा येथे राहणारे अरविंद टिकू (35) हे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. आर मॉलसमोरील सर्व्हिस रोडने कापूरबावडी पेट्रोल पंपाजवळ आले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील 15 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या दोन्ही घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलिसात 8 ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 (संपादन : वैभव गाटे)

thieves snatching mobile phones in thane read detail story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT