मुंबई

Lockdown3.0 :: तिसऱ्या लॉक डाऊनमध्ये काय सुरु काय बंद, वाईन शॉप्सबद्दल देखील झालाय निर्णय...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - देशातील दुसरा लॉक डाऊन ३ तारखेला संपतोय. अशात देशातील लॉक डाऊन पुन्हा एकदा १४ दिवसांसाठी वाढवण्यात आलाय. त्यामुळे आता आपण सर्वजण १७ मे पर्यंत लॉक डाऊनमध्ये असणार आहोत. लॉक डाऊन जरी वाढवला असला तरीही देशातील ग्रीन झोनमध्ये काही गोष्टी सशर्त शिथिक करण्यात येणार आहेत. देशातील त्या त्या भागातील रुग्णाची आकडेवारी पाहता तीन झोनमध्ये जिल्ह्यांची विभागवार करण्यात आली आहे. अशात त्या त्या झोननुसार काही नियमांमध्ये सूट दिली जाणार आहे.

एक नजर टाकुयात ४ तारखेपासून काय सुरु राहणार काय बंद राहणार यावर..

खालील बाबी तीनही झोनमध्ये बंद राहतील : 

  • केंद्र सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या नवीन नियमावलीप्रमाणे तिसऱ्या लॉक डाऊनमध्ये प्रवासी रेल्वे वाहतूक, प्रवासी विमान वाहतूक, मेट्रो आणि देशांतर्गत राज्यांतर्गत आणि जिल्ह्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक बंद राहील 
  • सर्व शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस  बंदच राहतील 
  • सर्व मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृह स्पोर्ट क्लब 17 मे पर्यंत बंदच राहतील.
  • सर्व धार्मिक स्थळं, हॉटेल, जिम बंद राहतील 
  • कोणताही राजकीय धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेता येणार नाही   

ग्रीन झोनमध्ये काय सुरु  राहणार खुलं?

  • जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत अशा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत  प्रवासी वाहतूक 50 टक्के करू शकतात. 
  • ग्रीन झोनमधील दुकानं, लहान उद्योगांना सशर्त परवानगी असेल 
  • ५० टक्के बस सेवा देखील सुरु करण्यात येणार आहे 
  • लग्न समारांभान देखील सशर्त परवानगी देण्यात आलेली आहे.  

दारूच्या दुकानांबाबत काय ? 

केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार ग्रीन झोनमधील वाईन शॉप्स आणि पानाची दुकानं सोशल डिस्टंसिंग नियमांचं पालन करून सुरु ठेवता येतील. अशा दुकानांवर ग्राहकांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर असायला हवं. या दुकानाबाहेर एका वेळास पाच पेक्षा जास्त ग्राहक उभे राहणार नाहीत याची काळजी घ्यायला लागेल 

third lockdown what will start what will not start read detail report on extended lockdown 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

मकरंद अनासपुरेंच्या 'अगडबम' चित्रपटातली नाजुका आठवतेय? १६ वर्षात इतकी बदलली, आता काय करते अभिनेत्री?

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT