माथेरान : नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये पर्यटकांच्या गर्दीत वाढ होत आहे. शनिवार आणि रविवारी माथेरानमध्ये १४ हजार पर्यटक दाखल झाले आहेत. येथील हॉटेल, लॉजिंग, खाद्यान्न गृहे, बाजारपेठा पर्यटकांमुळे गजबजल्या आहेत. यात शुक्रवारपासून मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रशासनाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
मुंबई आणि पुणेकरांसाठी सर्वात जवळचे आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. यात शुक्रवारी अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीवर एकमेव वन विभागाची पार्किंग आहे. सकाळपासूनच येथे खासगी वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत होती. दुपारपर्यंत हे वाहनतळ वाहनांनी हाऊसफुल्ल झाले.
माथेरानमधील वाहनतळ गाड्यांनी भरून गेल्यामुळे पर्यटकांनी आपल्या गाड्या घाटरस्त्यातच उभ्या केल्या होत्या. त्यामुळे मिनी बसला घाटातून मार्गक्रमण करणे कठीण झाले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती नववर्षानिमित्त अनेक पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे मांडवा, किहीम, अलिबाग, काशिद, दिवेआगर येथे दोन दिवसांत सुमारे अडीच ते तीन लाख पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची वाढती संख्या पाहून मालदार, पीएनपी, अजंठा या जलवाहतूक कंपन्यांनी बोटींच्या फेऱ्या ४० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मांडवा येथून अलिबागपर्यंत आणण्यासाठी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या उत्पनात वाढ
माथेरान नगरपालिकेला पर्यटकांच्या करामधून उत्पन मिळते. गेले पाच महिने पर्यटक कमी आल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पनात घट झाली होती. पण शुक्रवार आणि शनिवारी पर्यटक आल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
माथेरानमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. पालिकेतर्फे पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. जागोजागी कर्मचारी नेमले आहेत. पर्यटकांना माहिती देण्यासाठी माहिती कर्मचारी नेमले आहेत. पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पालिकेला महसूल चांगला मिळाला आहे. दोन दिवसांत नगरपालिकेला पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.