मुंबई

जेलमधून सुटल्यावर घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार 'गब्बर' गजाआड

शरद भसाळे

मुंबईः भिवंडी तालुक्यातील भूमी इंडस्ट्रियलमधील कृष्णा फॅब्रिक्सच्या गोदामातून कापडाची चोरी करताना गब्बर नावाच्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे.  7 लाख 68 हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत मध्यरात्रीच्या वेळी भरून हा गुन्हेगार पळवत होता. त्याच वेळेस या सराईत गुन्हेगारास त्यांच्या दोन साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कोनगाव पोलिस ठाण्याचे गणपत पिंगळे यांनी आपल्या पथकासह मोठ्या शिताफीतीने कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गब्बर उर्फ अजय हरिजन ( 35, रा. ऐरोली, नवीमुंबई ) मोहम्मद इरफान जैनुल आबिदिन शेख (27,रा, वडाळा मुंबई) संतोष खरात (38, रा. एरोली, नवीमुंबई ) असे लाखोंच्या घरफोडी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागातील भूमी इंडस्ट्रियल मधील कृष्णा फॅब्रिक्सच्या गोदामातून 7 लाख 68 हजार रुपयांचे सोफ्याकरिता लागणारे कापडाचे वेगवेगळ्या कंपनीचे रोल एका टेम्पोत भरून 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरून नेले होते. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात  घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे यांचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली.  त्यामुळे सदर पोलिस पथकाने चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक टेम्पो त्या दिवशी जाताना दिसला. या टेम्पोच्या नंबरवरून पोलिस घरफोड्या 'गब्बर' आणि त्याच्या साथीदारांपर्यत पोहचले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. 

गब्बर हा काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला असल्याची माहिती पोलिस उपाआयुक्त चव्हाण यांनी दिली. या आरोपी त्रिकूटांकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालासह टेम्पो जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पिंगळे करत आहे. 

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Three burglars arrested thane Bhiwandi Gabbar main accused

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT