Three people killed 3 seriously injured after a drunk driver hit seven vehicles Ulhasnagar Accident  
मुंबई

Ulhasnagar Accident News : मद्यधुंद कारचालकाचा प्रताप, सात वाहनांना उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू, ३ गंभीर जखमी

उल्हासनगर येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

रोहित कणसे

Ulhasnagar Accident News : उल्हासनगर येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका मध्यधुंद कारचालकाने दोन रिक्षा आणि ४ कारला जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता कल्याण बदलापूर मार्गावरील शांतीनगर परिसरात ही घटना घडली.

मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन रिक्षा आणि ४ कारना धडकली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रमोद दौंड, महेंद्र पांढरे, जावेद जाफर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT