Mumbai Local File Photo sakal
मुंबई

Mumbai Local Train : तीन ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनची धडक! मुंबईतील धक्कादायक प्रकार

रेल्वेचे तीन कर्मचारी रुळांवर ड्युटीवर असताना मुंबईजवळ लोकल ट्रेनखाली चिरडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

रोहित कणसे

Mumbai Local Train Accident News : रेल्वेचे तीन कर्मचारी रुळांवर ड्युटीवर असताना त्यांना मुंबईजवळ लोकल ट्रेनने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तीनही रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरू असताना रुळावर अचानक रेल्वे आली. कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे नेमकी कोणत्या रुळावर येणार याबद्दल गोंधळ झाला. त्यांनी रुळाच्या बाहेर धाव घेण्यास सुरुवात केली मात्र ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. लोकल ट्रेनने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना वसई-नायगाव परिसरात सोमवारी (२२ जानेवारी) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. वासू मित्र (वय ५६), सोमनाथ उत्तम लाबुतरे (वय ३७) आणि सचिन वानखेडे (वय ३७) अशी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT