MLA Ashish Shelar
MLA Ashish Shelar sakal media
मुंबई

मुंबईत 3 हजार कोटींचं बेकायदेशीर रॅकेट; टँकर माफियांवर कारवाईची मागणी

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत पाण्याचा 'बाजार' करुन सुमारे 3 हजार कोटींचे बेकायदेशीर रॅकेट (Three thousand crore illegal scam) चालवले जात असून मुंबईकरांच्या पाण्याचा 'व्यापार' (water supply business) कसा सुरू आहे याकडे आमदार आशिष शेलार (Ashish shelar) यांनी गंभीरतेने लक्ष वेधले आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी 18 हजार कोटी पाण्यात न घालता मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया (Tanker mafia) आणि त्यातून होणारी अंदाजे 3,000 कोटींची बेकायदेशीर अनियमित उलाढाल हेही एकदा तपासून पहा असे भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्र लिहून पालिका आयुक्तांच्या (bmc commissioner) लक्षात आणून दिले आहे. (three thousand crore water supply scam in mumbai action demand of ashish shelar)

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्‍त सी.डी. जोशी यांच्‍याकडे पत्र लिहून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआर मधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच यावर एसआयटी नियुक्त करुन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.

केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात 19,000 पेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. ज्यापैकी 12,500 बोअरवेल आहेत. मुंबई महानगरपालिकेने 251 जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 216 अवैध जलविहिरी असून यातील एकाच जलकुंभातून 80 कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचेही बाब काही प्रसिध्‍दी माध्‍यमांनी समोर आणली आहे.

यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. त्‍यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्‍यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्‍यक आहे.म्‍हणून मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्‍य नगरपालिकांच्या समन्वयाने त्वरित याबाबत एक एसआयटी कमिटी गठीत करून चौकशी होणे आवश्यक आहे.

ज्यांनी कोणत्याही परवानगी किंवा नियमांशिवाय भूजलाचा अतिरिक्त शोषण करीत पाणी उपसा केला आहे या प्रकरणी दोषी आढळतील अशांवर तातडीने एफआयआर दाखल करुन त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात यावी. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाची विद्यमान भूजल क्षमता याचा अभ्‍यास करुन पाणी उपसा किती प्रमाणात झााला पाहिजे याचे धोरण निश्चित करण्‍यात यावे, तसेच मुंबई आणि मुंबई महानगरातील मैदाने, बागा यांसाठी लागणारे पाणी याची आवश्‍यकता लक्षात घेऊन आवश्‍यक असणारे पाणी उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून सर्व महापालिकांनी स्‍वतःचे जलसंचयन धोरण ठरवून ते कार्यान्‍वीत करण्‍याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्या आमदार आशिष शेलार यांनी केल्या आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT