...काय नवलच! व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांनी केलं बाळाचं बारसं 
मुंबई

...काय नवलच! व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांनी केलं बाळाचं बारसं

सकाळ वृत्तसेवा

विरार :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून सरकारने एकमेंकात योग्य ते अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवण्याचे आवाहन केले आहे. असे असताना देखील अनेक लोक या आदेशाचे पालन करत नाही. मात्र, विरारच्या साखरे कुटुंबाने आपल्या घरातील नवजात बालकाचे बारसे चक्क व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून साजरे करत सर्वांपुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. 

विरार येथील वर्द विनायक लेन येथे राहणाऱ्या कल्पना जगदीश साखरे यांचा मुलगा अमेय आणि सून निकिता याना २६ मार्चला मुलगी झाली होती. कोरोनामुळे एकमेकांपासून अंतर राखणे आणि त्यात लागू असलेली संचारबंदी यामुळे घरी आलेल्या नव्या बाळाचे स्वागत आणि धार्मिक विधी कसे करायचे हा प्रश्न आल्यावर दोन्ही घरच्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरवले.  

अमेय हा स्वतः आयटी इंजिनिअर असल्याने हे सहजरित्या शक्य झाले. बाळंत झाल्यावर निकिता हि तिच्या तर अमेय त्याच्या घरी होता. अशात निकिताच्या घरचे चार जण एका बाजूला आणि अमेय आणि त्याची आई असे दोघे दुसऱ्या बाजूला आणि मग संध्याकाळी साडेपाचच्या मुहूर्तावर व्हिडीओ कॉलिंग सुरु झाली अमेयची आई आणि मुलीची आजी कल्पना यांनी आप-आपल्या घरून आरती करत पाळणा देखील म्हणला. त्यानंतर मुलीचे नाव दुर्गा ठेवण्यात आले. अशाप्रकारे साखरे कुटुंबाने खऱ्या अर्थाने सोशल डिस्टन्सिंग पाळून बारसे साजरे केले आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांसमोर एक नवा आदर्श निर्माण ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT