मुंबई

'टिपू'चे मारेकरी सापडले !

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई : कोपरखैरणे, सेक्‍टर १९ मध्ये अज्ञाताने टिपू रफिक शेख (३८) याची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. 
 या प्रकरणी सुनीता गुप्ता (४०, रा. कोपरखैरणे, सेक्‍टर १९), साजन ऊर्फ मोहम्मद तुजमल (४०) आणि प्रकाश डाकवा (४०) या तिघांना अटक केली आहे. सुनीतानेही हत्या घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेतील मृत टिपू रफीक शेख हा फिरस्ता असून तो कोपरखैरणे भागात मागील अनेक वर्षांपासून मिळेल, त्या ठिकाणी राहून गुजराण करत होता. टिपू शेख हा सुनीता गुप्ता राहत असलेल्या चाळीत नेहमी जाऊन तिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत होता. त्यामुळे तिने टिपूचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेऊन आपल्या ओळखीतील साजन तुजमल व प्रकाश डाकवा यांना टिपूला कायमचे संपविण्यास सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री साजनने टिपूला आपल्या घरामध्ये आणल्यानंतर साजन आणि प्रकाश या दोघांनी त्याची गळा चिरून 
हत्या केली.

मृतदेह फरपटत आणून फेकला
शुक्रवारी सकाळी सदर घटना उघडकीस आल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टिपूचा मृतदेह ताब्यात घेतला. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात टिपूचा मृतदेह हा आरोपी साजनच्या घरातून चादरीत बांधून फरफटत म्युझिकल बंॅन्डच्या व्हरांड्यात टाकला.त्यामुळे पोलिसांनी साजनला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने प्रकाशच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार शनिवारी साजन आणि प्रकाश या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुनीताला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

गरज पडल्यास ‘एन्काऊंटर’ही करणार; पदभार स्वीकारताच विश्वास नांगरे-पाटलांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

IND vs IRE: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अश्विनचा संताप; थेट IPL वरच फोडलं खापर, म्हणाला...

१९ वर्षांचा झाला iPhone; सुरुवातीला नव्हते व्हिडिओ रेकॉर्डिंग ! जाणून घ्या Apple च्या पहिल्या स्मार्टफोनची गोष्ट...

Latest Marathi News Live Update: कोर्टाने नवीन उदाहरण समोर आणलं आहे- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT