मुंबई

"बच्चन जेंव्हा असं करतात तेंव्हा..."; महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा गंभीर आरोप

सुमित बागुल

मुंबई : अमिताभ बच्चन तसे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. आपल्या आसपास काहीही चांगलं किंवा वाईट घडलं की त्यावर चपखल शब्दात व्यक्त होणारे बिग बी आपण नेहमीच अनुभवतो. मात्र अमिताभ यांनी शेअर केलेल्या अशाच एका फेसबुक पोस्टवरून अमिताभ बच्चन यांच्यावर एका तरुणीने थेट चोरीचे आरोप लावलेत. स्वतःच्या फेसबुकवरून या तरुणीने अमिताभ बच्चन यांना टॅग देखील केलंय आणि "अमिताभ बच्चन जेंव्हा असं करतात तेंव्हा हसावं की रडावं" असं कॅप्शन या तरुणीने लिहिलंय. 

नक्की हा प्रकार आहे तरी काय ?

त्याचं झालं असं की, अमिताभ बच्चन बच्चन यांनी २४ डिसेंबररोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अमिताभ यांनी एक सुंदर कविता शेअर करत चहा पितानाचा स्वतःचा फोटो देखील टाकलाय. दरम्यान, टीशा अग्रवाल नामक तरुणीने अमिताभ यांनी आपली कविता वापरल्याचा आरोप केलाय.

"जब Amitabh Bachchan आपकी पोस्ट की कॉपी करें और क्रेडिट भी न दें, खुश होएं की रोएं "

म्हणजेच जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याबद्दल सौजन्य देखील देत नाहीत तेंव्हा हसावे की रडावे" अशी भावना असल्याची पोस्ट या तरुणीने टाकली आहे.  

या संदर्भात या तरुणीने एका वेबसाईटला माहिती दिली आहे. माझी कविता मी फेसबुकवर शेअर केली होती. मात्र अमिताभ यांनी माझी कविता जशीच्या तशी कॉपी केली आणि स्वतःच्या फेसबुक पोस्टवर टाकली ज्याचे मला सौजन्य देखील देण्यात आले नाही. त्यामुळे स्वतः लिहिलेल्या कवितेचं श्रेय मिळायला हवं म्हणून बिग बी अमिताभ यांना टॅग करून पोस्ट केल्याचं म्हटलंय. 

tisha agarwal alleged big b Amitabh bachchan for stealing her poem and share without credits

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वंजारी समाज आक्रमक; गृहमंत्र्यांकडे 302 अंतर्गत गुन्ह्याची मागणी

मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र? एक्स बॉयफ्रेंडने दिलेल्या खास पद्धतीने शुभेच्छा, म्हणाला...'नेहमी तु अशीच...'

Satara Doctor Case : चार वेळा बलात्कार करुन छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरनं संपवलं जीवन, साताऱ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT